[ad_1]
अभिनेता शशांक केतकर याने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’च्या ऑफिसमध्ये उभा असलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शशांक केतकर याच्या हातात कॉफी मग देखील दिसत आहे, ज्यावर ‘धर्म्याटीक’ असे लिहिले आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना शशांक केतकरने लिहिले की, ‘शो टाईम! ८ मार्च पासून फक्त डिस्नेप्लस हॉटस्टारवर… जेव्हा धर्माच्या ऑफिसमध्ये मिटिंगसाठी जाता तेव्हा.. कुछ कुछ होता है… काम छोटं आहे, पण लक्षात राहण्यासारखं आहे.’
[ad_2]
Source link
