Monday, August 31, 2026
Homeक्रीडाDhruv Jurel : ध्रुव झुंजला; भारताचा डाव सावरला, इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी...

Dhruv Jurel : ध्रुव झुंजला; भारताचा डाव सावरला, इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी | पुढारी

Dhruv Jurel : ध्रुव झुंजला; भारताचा डाव सावरला, इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने दिलेल्या 353 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडला 46 धावांची आघाडी आहे. ध्रुव जुरेलच्‍या झुंझार खेळीने भारताचा पहिल्‍या डाव सावरला. त्‍याने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 90 धावांची निर्णायक खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताने सामन्यात पुनरागमन केले. (Dhruv Jurel)

ध्रुव-कुलदीपची निर्णायक भागीदारी

आज भारताने सात विकेट्सवर 219 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 88 धावा करताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला. कुलदीप २८ धावा करून बाद झाला. त्याने जुरेलसोबत ७६ धावांची निर्णायक भागीदारी केली. यानंतर आकाश दीप याने जुरेलसोबत 40 धावांची भागीदारी केली. नऊ धावा करून आकाश बाद झाला. शोएब बशीरने या दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच बळी मिळवण्याची किमया साधली. जुरेल शेवटची विकेट म्हणून बाद झाला. (Dhruv Jurel)

कर्णधार रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ 17 धावा करू शकला. रवींद्र जडेजा 12 धावा करून बाद झाला. रोहितला अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर शुभमन, रजत आणि जडेजा यांना शोएब बशीरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दरम्यान, यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, 73 धावा करून तो बशीरचा बळी ठरला. सरफराज 14 धावा करून आऊट झाला तर अश्विन 1 धावा करून बाद झाला. या दोघांना हार्टलेने बाद केले. इंग्लंडकडून बशीरने पाच आणि हार्टलेने तीन बळी घेतले. तर जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या.

हेही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments