Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशCrime News | पतीसोबत वाद झाल्याने राग झाला अनावर; महिलेने 3 वर्षांच्या...

Crime News | पतीसोबत वाद झाल्याने राग झाला अनावर; महिलेने 3 वर्षांच्या मुलीला टेकडीवर सोडल्याने मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Crime News | पतीसोबत वाद झाल्याने राग झाला अनावर; महिलेने 3 वर्षांच्या मुलीला टेकडीवर सोडल्याने मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पतीसोबत वाद झाल्याने राग झाला अनावर; महिलेने 3 वर्षांच्या मुलीला टेकडीवर सोडल्याने मृत्यू

छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिला सरपंचाने आपल्या 3 वर्षांच्या मुलीला घनदाट जंगलात सोडले. त्यामुळे या मुलीचा भुकेने आणि तहानने मृत्यू झाला. घरगुती वादानंतर रागावून ही महिला दोन मुलांना घेऊन निघून गेली होती.

रायपूर : छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिला सरपंचाने आपल्या 3 वर्षांच्या मुलीला घनदाट जंगलात सोडले. त्यामुळे या मुलीचा भुकेने आणि तहानने मृत्यू झाला. घरगुती वादानंतर रागावून ही महिला दोन मुलांना घेऊन निघून गेली होती. संध्याकाळी ती परत आली तेव्हा तिच्यासोबत एकच मुलगा होता. सखोल तपास केल्यानंतर 4 दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मुंगेली जिल्ह्यातील पटपराहा या वन गावातील आहे. येथील महिला सरपंच संगीता पंद्रम यांचा पती शिवराम पंद्रम यांच्याशी 6 मे रोजी काही कारणावरून वाद झाला होता. यानंतर महिला सरपंच आपल्या दोन मुलांसह सायंकाळी आई-वडिलांच्या घरी जाण्यासाठी पायी निघाली. दोन मुलांपैकी 3 वर्षांची मुलगी अनुष्का आणि एक वर्षाचा मुलगा महिलेसोबत होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments