Tuesday, August 18, 2026
Homeसाताराअजित पवारांच्या टिकेला धैर्यशील मोहिते-पाटीलांचा प्रत्युत्तर शंखनाद; साखरवाडीत राष्ट्रवादीची सभा आज रात्री"

अजित पवारांच्या टिकेला धैर्यशील मोहिते-पाटीलांचा प्रत्युत्तर शंखनाद; साखरवाडीत राष्ट्रवादीची सभा आज रात्री”


फलटण :- फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे आज रात्री 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची सभा होणार आहे. या सभेचे आयोजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. पवारांच्या त्या सभेत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापविणाऱ्या अनेक टीका करण्यात आल्या होत्या. विशेषतः रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर पवारांनी जोरदार हल्लाबोल केला होता.

अजित पवारांच्या या तीव्र टीकेनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील या सभेत काय भूमिका घेणार आणि जिल्ह्याच्या राजकारणातील या संघर्षाला कसा प्रत्युत्तर देतील, याकडे तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या समर्थकांकडून अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असे बोलले जात आहे.

या सभेला तालुक्यातील नागरिक, नेतेमंडळी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पवारांच्या टिकेला धैर्यशील मोहिते पाटील काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments