Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदाचा निर्णय अद्याप प्रलंबित; एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय अद्याप प्रलंबित; एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा लोटला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने बहुमताचा आकडा पार करत सत्ता स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या निर्णायक मुद्द्यावर महायुतीत अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी साताऱ्यातील त्यांच्या मूळ दरे गावी पोहोचले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्याबाबत बोलताना म्हटले, “शिंदे साहेब मोठा निर्णय घ्यायच्या आधी नेहमीच आपल्या गावाला जातात. मात्र, उपमुख्यमंत्रिपद शिंदे स्वीकारतील असे मला वाटत नाही.”

महायुती बैठक आणि शपथविधीची शक्यता:
महायुतीची महत्त्वाची बैठक 1 डिसेंबर रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन निरीक्षक या बैठकीसाठी उपस्थित राहतील, ज्यात भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अशीही माहिती मिळाली आहे.

महायुतीतील खातेवाटपावरही चर्चा सुरू असून शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असला तरी गृह व अर्थसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

एकनाथ शिंदे आज त्यांच्या दरे गावातून काय निर्णय जाहीर करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीतील घडामोडींवर येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments