
Goods Train Derails Between Kasara And Igatpuri: कसारा आणि इगतपुरीदरम्यान डाउन लाईनवर संध्याकाळी ६.३१ वाजता मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे कसारा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक गांड्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, लोकल सेवा सुरु आहे. मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली.





