Cargo Railway | मालवाहतुकीतून रेल्वे झाली ‘मालामाल’; रेल्वेने कमावले तब्बल 1500000000000 रुपये | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Cargo Railway | मालवाहतुकीतून रेल्वे झाली ‘मालामाल’; रेल्वेने कमावले तब्बल 1500000000000 रुपये | Navarashtra (नवराष्ट्र)


मालवाहतुकीतून रेल्वे झाली ‘मालामाल’; रेल्वेने कमावले तब्बल 1500000000000 रुपये

चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 1,55,557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंतची आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते फेब्रुवारी 2024 पर्यंत देशात 1434.03 टन मालवाहतूक झाली आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 1,55,557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंतची आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते फेब्रुवारी 2024 पर्यंत देशात 1434.03 टन मालवाहतूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 66.51 टन जास्त मालवाहतूक झाली आहे.

एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1,367.5 टन मालवाहतुकीच्या तुलनेत 1434.01 टन मालवाहतूक केली आहे. भारतीय रेल्वेने यावर्षी मालवाहतुकीतून 1,55,557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 1,49,088.1 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षी रेल्वेच्या उत्पन्नात सुमारे 6,468.17 कोटी रुपयांची वाढ आहे. फेब्रुवारीत रेल्वेने 136.60 टन मालवाहतूक केली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत यावर्षी मालवाहतुकीत 10.13 टक्क्यांची वाढ झाली आहे.






Source link