Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशBIRYANI | सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर,...

BIRYANI | सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर, तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई | Navarashtra (नवराष्ट्र)

BIRYANI | सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर, तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर, तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई

सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर : भारत सांस्कृतिक वारशासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच भारतीय खाद्यपदार्थ म्हणजे अनेकांचा आवडीचा विषय. परदेशी नागरिक खास त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ चाखण्यासाठी भारताला भेट देतात. यातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी भारतीय डिश म्हणजे ‘बिर्याणी’. भारतीयांमध्येही बिर्याणी (Biryani) सर्वात प्रसिद्ध आहे. यामुळेच सलग आठव्या वर्षी सर्वाधिक लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली आहे. हैदराबादींना तर बिर्याणी खाण्याचा कंटाळाच येत नाही. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एकट्या ‘स्विगी’ या फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर ७२ लाख बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा बिर्याणीची मागणी ८.३९ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या १२ वर्षापर्यंत बिर्याणीच्या एकूण ऑर्डर १.५० कोटी होत्या. तुम्ही इतर ऑनलाइन फूड प्लॅटफॉर्मवर दिलेल्या ऑर्डर्स आणि थेट रेस्टॉरंटमधून होणारी विक्री जोडल्यास, बिर्याणीच्या मागणीची संख्या अनेक पटींनी वाढेल. बिर्याणी प्रकारातील सर्वाधिक ऑर्डर करण्यात येणारी बिर्याणी म्हणजे ‘दम बिर्याणी’. नऊ लाखांहून अधिक ऑर्डरसह ‘दम बिर्याणी’ चॅम्पियन म्हणून उदयास आली आहे. त्यापाठोपाठ ७.९ लाख ऑर्डर या बिर्याणी राईस आणि ५.२ लाख ऑर्डरसह मिनी बिर्याणीचा क्रमांक लागतो.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments