
अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या;पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यानंतर त्यांनी आपल्या घरीच पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, “मी आज दाखवणार होते की,मंत्री छगन भुजबळ यांची सांताक्रुझमधील टोलेजंग इमारत ही त्यांची नाही आहे तर लुबाडलेल्या जागेवर उभी आहे,मूळ जागा मालकाला अद्याप एक पैसाही मिळालेला नाही. असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यावेळी केला. “ज्या माणसाला उठसुठ छातीत कळ यायची,ती कळ कुठे गेली”,असा सवालही त्यांनी केला.



