Sunday, September 20, 2026
Homeसाताराक्रांतिसिंह नाना पाटील चौकात पालखी सोहळ्यातील वाहने पुढे न सोडल्यामुळे पालखी सोहळा...

क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पालखी सोहळ्यातील वाहने पुढे न सोडल्यामुळे पालखी सोहळा विश्वस्त व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली

फलटण :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटणचा मुक्काम आटपून भल्या पहाटे बरड कडे पुढील मुक्कामासाठी निघाली असता फलटण शहराच्या मुख्य क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पालखी सोहळ्यातील वाहने पुढे न सोडल्यामुळे पालखी सोहळा विश्वस्त व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. फलटण पोलिसांचा ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्न उद्भवला असल्याचे बोलले जात आहे.पालखी सोहळ्यातील दिंड्यांची वाहने क्रमपात्र पुढे सोडण्याचा प्रघात असून ही वाहने पुढे जाऊन दिंडीतील वारकऱ्यांना नाष्टा जेवणाची सोय करत असतात परंतु ही वाहने पालखी सोहळ्याच्या मागे राहिल्याने हा वाद निर्माण झाला.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी चौकातच माऊली सोहळा थांबून अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल व फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना जाब विचारत अनेक प्रश्नांचा भडीमार विश्वस्तांनी त्यांच्यावर केला या संदर्भात पोलीस प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आली नसल्यामुळे हा वाद पुढे विकोपाला गेल्याचे दिसले.दरम्यान स्वतःपालखी सोहळा विश्वस्त,चोपदार आणि प्रमुख दिंडीप्रमुखांनी क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील झालेली ट्राफिक मोकळी करून माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ केली

माऊलींच्या पालखी रथ सकाळी नाना पाटील चौकातून ०८: ३६ मिनिटांने बरडच्या दिशेला मार्गस्थ झाला.आळंदी संस्थांच्या झालेल्या मीटिंगमध्ये संस्थांकडून दिलेले सूचना यांचे पालन पोलिसांकडून होत नसल्याने आळंदी संस्था कमिटी कडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार (आरफळकर) रस्त्यावर उतरले होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments