
Aman Sehrawat Wins Bronze Medal in Paris: कुस्तीपटू अमन सहरावतने शुक्रवारी शानदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. सेहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डेरियन टोई क्रूझचा १३-५ असा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकध्ये भारताच्या पदकांची संख्या ६ वर पोहोचली आहे.