
अजित पवार यांचे दिवाळी स्नेहमिलन रद्द
आजारपणामुळे सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. पवार हे दरवर्षी बारामतीमध्ये दिवाळीदरम्यान सर्वांना भेटत असतात. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण करत असतात. परंतु पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना भेटता येणार नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, मतदारसंघातील सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो’ असा शुभेच्छा संदेश अजित पवार यांनी दिला आहे.







