Ajit Pawar : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांनी सोडले मौन

0
43
Ajit Pawar : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांनी सोडले मौन


अजित पवार म्हणाले, काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.



Source link