Sunday, October 4, 2026
Homeसातारातडकाफडकी प्रतिक्रिया: 'रामराजे प्रचार करत नाहीत, त्यांना नोटीस पाठवतो' - अजितदादा पवार

तडकाफडकी प्रतिक्रिया: ‘रामराजे प्रचार करत नाहीत, त्यांना नोटीस पाठवतो’ – अजितदादा पवार

फलटण :- सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याचा मुद्दा फलटणमधील पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे उपस्थित केला. यावर अजितदादा पवार यांनी तडकाफडकी प्रतिक्रिया देत, “रामराजे प्रचारात दिसत नाहीत, त्यांना नोटीस काढतो,” असे ठामपणे सांगितले.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन पाटील यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन आज करण्यात आले. याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रचारावर भाष्य करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभानिहाय जाहीरनामा काढण्याचा निर्णय घेतला असून, जाहीरनामा ‘वचननामा’ म्हणून पालन केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देण्याचा दादांचा निर्धार आहे. मात्र, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महायुतीत असूनही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत नसल्याने जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रामराजेंनी काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळी महायुतीचे उमेदवार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर आणि माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments