Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशवंदे भारत, राजधानी, शताब्दी.... या प्रिमीयम ट्रेनचे मालक कोण? भारतीय रेल्वे तर...

वंदे भारत, राजधानी, शताब्दी…. या प्रिमीयम ट्रेनचे मालक कोण? भारतीय रेल्वे तर…

वंदे भारत, राजधानी, शताब्दी…. या प्रिमीयम ट्रेनचे मालक कोण? भारतीय रेल्वे तर…

[ad_1]

Rajdhani Express Owner: भारतीय रेल्वेचा आता संपूर्ण लक्ष सध्या हाय स्पीड ट्रेनवर आहे. यामुळं प्रवाशांचा प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार आहे. भारतीय रेल्वेकडे सध्या वंदे भारत, शताब्दी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या अनेक सुपरफास्ट ट्रेन आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या ट्रेनचे मालक कोण आहेत. तर दुसरीकडे आयआरएफसी (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पेरेशन) नवरत्न कंपनीचा दर्जा मिळण्याची चर्चा आहे.

रेल्वे सेक्टरमध्ये लोन देण्याचा बिझनेस वाढणार

सरकारकडून आयआरएफसीला नवरत्नचा दर्जा देण्यात आल्यानंतर कंपनीचे सीईओ आणि सीएमडी मनोज कुमार दुबे यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, नवरत्न दर्जा मिळाल्याने कंपनीला अनेक आर्थिक सार्वभौम अधिकार मिळाले आहेत. या दर्जामुळे मंडळाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. आता कंपनी जलद निर्णय घेऊ शकेल. आता आम्ही रेल्वे क्षेत्रातील आमच्या कर्ज देण्याच्या व्यवसायाला आणखी गती देऊ.

वंदे भारत आणि शताब्दी सारख्या विशेष गाड्यांचे मालक कोण? 

मनोज कुमार दुबे यांनी या संदर्भात सांगितले की, भारतीय रेल्वेमध्ये वापरले जाणारे सर्व इंजिन, मालगाडीचे डबे आणि प्रवासी डबे हे भारतीय रेल्वे वित्त महामंडळाचे (IRFC) आहेत. हे रेल्वेला 30 वर्षांसाठी भाड्याने दिले जातात. या गाड्यांसाठीचे पैसे आयआरएफसीच्या निधीतून येतात. भाडेपट्टा नियमांनुसार, हे 30 वर्षांसाठी आयआरएफसीच्या नावावर राहतात.

म्हणूनच वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दी सारख्या सर्व विशेष गाड्या तांत्रिकदृष्ट्या आयआरएफसीची मालमत्ता आहेत. याचा अर्थ असा की भारतीय रेल्वेच्या सुमारे ८० टक्के प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या आयआरएफसीच्या आहेत. भारतीय रेल्वेच्या प्रगतीत ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते.

मनोज कुमार दुबे यांच्या मते, रेल्वेला वाटप केलेल्या बजेटव्यतिरिक्त ज्या काही अतिरिक्त निधीची आवश्यकता असते, ते बाजारातून कमी किमतीत खरेदी केले जाते आणि रेल्वेला खूप कमी नफ्यात दिले जाते. आयआरएफसी गेल्या 40 वर्षांपासून हे काम करत आहे. रेल्वे व्यतिरिक्त, आयआरएफसी रेल्वे इकोसिस्टम संबंधित इतर प्रकल्पांना देखील अर्थपुरवठा करेल. कंपनी या सर्व प्रकल्पांसाठी कमी व्याजदराने निधी उपलब्ध करून देईल.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments