Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशViral Video: 'बेबी तू आला नाहीस, तू बोलला होतास', शहीद पायलटच्या अंत्ययात्रेत...

Viral Video: ‘बेबी तू आला नाहीस, तू बोलला होतास’, शहीद पायलटच्या अंत्ययात्रेत धायमोकळून रडली प्रेयसी

Viral Video: ‘बेबी तू आला नाहीस, तू बोलला होतास’, शहीद पायलटच्या अंत्ययात्रेत धायमोकळून रडली प्रेयसी

[ad_1]

Viral Video Pilot Siddharth Yadav: हरियाणाच्या रेवाडी येथील शहीद फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांना आज सन्मानापूर्वक अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या मूळ गावी भालखी माजरा येथे वडील सुशील यादव यांनी त्यांच्या 28 वर्षीय मुलाच्या चितेला अग्नी दिला. यावेळी, हवाई दलाच्या तुकडीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान, सिद्धार्थ यादवची होणारी बायको सानिया धायमोकळून रडत होती.

साखरपुड्याच्या 10 दिवसांनी शहीद

सिद्धार्थचा 10 दिवसांपूर्वी सानियाशी साखरपुडा झाला होता. सिद्धार्थला अंतिम निरोप देण्यासाठी सानियाही पोहोचली होती. सिद्धार्थचं पार्थिव पाहिल्यानंतर तिला अश्रू अनावर होत होते. फोटोकडे पाहून ती म्हणाली, “बेबी, तू मला घ्यायला आला नाहीस. तू येशील असं म्हणाला होतास.” सिद्धार्थ आणि सानियाचं 2 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. दोघांच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. मृतदेहाकडे पाहत सानिया पुन्हा पुन्हा म्हणत होती, “कृपया मला एकदा त्याचा चेहरा दाखवा.” दरम्यान सिद्धार्थच्या हौतात्म्याचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मला माझ्या मुलाचा गर्व आहे, आईने मांडल्या भावना

शहीद जवानाची आई सुशीला यादव आणि बहीण खुशी या या क्षणी खूप दुःखात बुडाल्या होत्या. मुलाला अंतिम निरोप देताना आई भावूक झाली आणि म्हणाल्या, “मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मी देशातील प्रत्येक आईला सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या मुलांना देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात पाठवावे. तो कधीही घाबरला नाही, परंतु अभिमानाने देशासाठी आपले जीवन अर्पण केले. आमचे संपूर्ण कुटुंब सैन्यात आहे आणि हे माहित असूनही मी त्याला सैन्यात पाठवले. मला त्याच्या हौतात्म्याचा अभिमान आहे,” अशी भावना त्यांनी मांडली. “तो व्यक्ती म्हणून कसा होता, हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

लोकांना वाचवण्यासाठी दिला जीव

सुशील यादव यांनी अभिमानाने सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी सैन्यात सेवा केली आहे. त्या म्हणाल्या, “मला सांगण्यात आलं की सिद्धार्थ शेवटच्या क्षणी पॅराशूटने उडी मारू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही कारण खाली सामान्य लोक होते. स्वतःच्या जीवाची चिंता न करता, त्याने लोकांचे जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.”



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments