Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशमहाकुंभमेळा अंतराळातून कसा दिसतो? पाहा ISRO ने टिपलेले अद्भुत क्षण

महाकुंभमेळा अंतराळातून कसा दिसतो? पाहा ISRO ने टिपलेले अद्भुत क्षण

[ad_1]

Maha Kumbh Mela ISRO: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून, भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाकुंभमेळ्याचे भारताची अंतराळ संस्था इस्रोने सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो टिपले आहेत. या फोटोंमध्ये प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. महाकुंभमेळ्यात 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. 

भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आणि दिवसा आणि रात्री पाहण्यास सक्षम रडारसॅटचा वापर करून, हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील भव्य पायाभूत सुविधांच्या उभारणीचे अनेक फोटो कैद करण्यात आले आहेत. फोटोमध्ये उभारण्यात आलेलं तंबू शहर आणि नद्यांवर उभारण्यात आलेले पूल दिसत आहेत. एनआरएससीचे संचालक डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, त्यांनी रडारसॅटचा वापर केला कारण तो प्रयागराजला वेढलेल्या ढगांच्या पट्ट्यातून प्रदेशाचे चित्रण करू शकतो.

उत्तर प्रदेशातील प्रशासन या फोटोंच्या आधारे मेळ्यातील दुर्घटना आणि चेंगराचेंगरी कमी करण्यासाठी वापर करत आहे. 6 एप्रिल 2024 रोजी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी काढलेल्या या टाइम सीरिजच्या फोटोंमध्ये प्रयागराज परेड मैदान दिसत आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2024 रोजी तिथे हालचाली होताना दिसत आहेत. यानंतर मैदानात मोठी गर्दी जमू लागल्याचं 10 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या फोटोत दिसत आहे.
 
नव्याने उभारण्यात आलेलं शिवालय पार्क स्पेसमधून दिसत आहे. 6 एप्रिलच्या फोटोत मोकळं मैदान दिसत आहे. यानंतर 22 एप्रिलला शिवालय पार्क उभं राहतं. यानंतर 10 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या फोटोत भव्यता दिसत आहेत. 

या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात महाकुंभ नगर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे, जो त्रिवेणी संगम येथे साजरा केला जातो, जिथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्या एकत्र येतात. यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1 लाख 50 हजार तंबू आहेत. तसंच 3000 स्वयंपाकघरे, 1 लाख 45 हजार शौचालये आणि 99 पार्किंग लॉट आहेत.

या वर्षी, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करत आहे. महाकुंभमेळ्यासाठी सुमारे 26  हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यात आली आहे आणि सुमारे 12 किलोमीटर अतिरिक्त स्नानघाट तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक लोकांनी संगमावर स्नान केले आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments