Thursday, September 3, 2026
Homeसातारास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: फलटण तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडत जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: फलटण तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडत जाहीर

फलटण :राज्यात दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर, प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 1 जानेवारी 2024 ते 4 जानेवारी 2025 दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत 2 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता पंचायत समिती कार्यालय, फलटण येथे होणार आहे.

यावेळी फलटण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडतीचा समावेश असेल. या ग्रामपंचायतींची यादी पुढीलप्रमाणे आहे:

1. तरडगाव

2. विठ्ठलवाडी

3. खडकी

4. मिरगाव

5. गोखळी

6. खटकेवस्ती

7. माळेवाडी

8. शिंदेमाळ

9. चांभारवाडी

10. मिरेवाडी (दालवडी)

11. दालवडी

12. आसू

13. ढवळेवाडी (आसू)

14. सासवड

15. टाकुबाईचीवाडी

16. उलुंब

17. जोर (वाखरी)

18. जोर कुरवली खुर्द

19. परहर खुर्द

20. गोळेवाडी

21. गोळेगाव

22. माझेरी

लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी होणाऱ्या या आरक्षण सोडतीकडे स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments