पुण्यातील प्रसिद्ध शाळेत ११ वर्षांच्या मुलावर नृत्य प्रशिक्षकाने केला अत्याचार! पालकांचा संताप

0
15
पुण्यातील प्रसिद्ध शाळेत ११ वर्षांच्या मुलावर नृत्य प्रशिक्षकाने केला अत्याचार! पालकांचा संताप


Pune Warje Malwadi Crime news : पुण्यात पालघर सारखी एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वारजे माळवाडी येथील एका नामांकित शाळेत ११  वर्षांच्या मुलावर शाळेतील नृत्य प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनामुळे ही घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे पालक संतत्प झाले आहे. शाळा प्रशासनाला जाब विचारत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार रात्री आरोपी नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज शाळा बंद ठेवण्याचे आवाहन पालकांनी केला असून आंदोलन देखील केले जाणार आहे.



Source link