Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रमतदानावरून वादग्रस्त परिस्थिती: मारकवाडी ग्रामस्थांची बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी फेटाळली

मतदानावरून वादग्रस्त परिस्थिती: मारकवाडी ग्रामस्थांची बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी फेटाळली

सोलापूर, ३ डिसेंबर: माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडी गावात आज मतदान प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला. ग्रामस्थांनी ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप उमेदवार राम सातपुते यांना मिळालेले मताधिक्य अशक्य आहे.

ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत बॅलेट पेपर वापरण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी मतपत्रिकाही छापून आणल्या होत्या. मात्र, प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी फेटाळली आणि पोलिसांनी गावात जमावबंदीचा आदेश लागू केला.

पोलिसांची कारवाई आणि ग्रामस्थांची प्रतिक्रिया

गावात पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने भीतीचे वातावरण पसरले. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमलेल्या लोकांना पोलिसांनी स्पीकरवरून सूचित केले की, १४४ कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी विरोध केला, पण पोलिसांच्या दमबाजीमुळे ते घराकडे परत गेले.

मतदान रद्द करण्याचा निर्णय

माळशिरसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. “ग्रामस्थांची मागणी योग्य असूनही प्रशासनाने दबाव आणून मतदान रद्द केले. आम्ही न्याय मिळवण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब करू,” असे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांची नाराजी कायम

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मतदान प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या भूमिकेमुळे त्यांचा रोष वाढला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments