Friday, September 4, 2026
Homeसाताराशिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी विनायक मदने यांची बिनविरोध निवड

शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी विनायक मदने यांची बिनविरोध निवड

फलटण (सासकल, ता. फलटण):
मौजे सासकल, ता. फलटण, जि. सातारा येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी संचलित शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनायक नारायण मदने यांची बिनविरोध निवड झाली.

शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा व भौतिक सुविधांच्या उन्नतीवर चर्चा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची पालक सभा विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. या सभेत सर्व पालकांच्या सहमतीने सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध करण्यात आली.

निवडलेल्या पदाधिकारी व सदस्य

अध्यक्ष: विनायक नारायण मदने

सचिव: संजय प्रभू कर्णे

ग्रामपंचायत सदस्य: हणमंत गंगाराम मुळीक

सदस्य: शामराव गजानन मुळीक, लक्ष्मण पांडुरंग मुळीक, निकिता दीपक घोरपडे, देवदास नारायण सुतार, नवनाथ खोमणे, माधुरी भास्कर मदने

विद्यार्थी प्रतिनिधी: ओंकार दादासो मुळीक, तन्वयी मच्छिंद्र मुळीक

शिक्षणतज्ञ: शंकर राजाराम मुळीक

शिक्षक प्रतिनिधी: शिवाजी चंद्रकांत सुतार

अभिनंदनाचा वर्षाव

नवीन समितीच्या निवडीबद्दल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र घोरपडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व गावातील मान्यवरांनी अभिनंदन केले. यामध्ये जि.प. प्राथमिक शाळा सासकलच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप अशोक मुळीक, उपाध्यक्ष दिनेश दत्तात्रय मुळीक, माजी सरपंच लक्ष्मण गणपत मुळीक, जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी मुळीक, व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख सह्याद्री चिमणराव कदम आदींचा समावेश होता.

येत्या काळात शाळा सुधारण्यावर भर

सभेत शाळेच्या गुणवत्तेत वाढ करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. शैक्षणिक व भौतिक पातळीवरील उन्नतीसाठी सर्व पालक आणि शिक्षकांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments