Sunday, September 13, 2026
Homeसाताराप्रस्थापित नेत्यांच्या विरोधात चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याची लढाई – ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश...

प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याची लढाई – ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव

फलटण :- फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी प्रस्थापित नेत्यांवर तीव्र टीका करत चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांची ताकद दाखवून दिली आहे.

“दोन कारखानदारांविरुद्ध माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील माणसाला लढण्याचे बळ चळवळीने दिले,” असे सांगत त्यांनी समाजाने जागरूक होण्याचे आवाहन केले.

“प्रस्थापित नेतृत्वाला समाजातील तरुण व्यसनाधीन व चुकीच्या मार्गावर जावं अशीच अपेक्षा आहे. मात्र, ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची व आत्मसन्मानाची आहे. समाजाने ठरवायचं आहे की प्रस्थापित पक्षांच्या छायेखाली जायचं की चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांच्या सोबत राहायचं,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“मी जिंकण्याची किंवा हरण्याची चिंता करत नाही. माझा समाज माझ्यासोबत आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे,” असे म्हणत त्यांनी या लढाईत समाजाच्या पाठिंब्याचे महत्व अधोरेखित केले.

प्रा. रमेश आढाव यांचे हे वक्तव्य निवडणूक संघर्षाला नवी दिशा देणारे ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments