Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रमतांच्या राजकारणात प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचा हक्क अबाधित राहतो का?

मतांच्या राजकारणात प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचा हक्क अबाधित राहतो का?

पुणे :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवारांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या मतदारांना मतदानासाठी मतदारसंघात परत आणण्याची जबाबदारी उमेदवारांनी घेतली आहे. मात्र, या सगळ्या राजकारणाच्या गोंधळात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतोय – प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचा.

प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या मतांचे काय?

ज्या जोडप्यांनी सामाजिक किंवा कौटुंबिक विरोध झेलत प्रेमविवाह केले आणि त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले, त्यांच्या मतांचा विचार कोण करतो? ते आजही मतदारसंघाचे नागरिक आहेत. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी या जोडप्यांना त्यांच्या हक्काचा मतदान अधिकार बजावण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यांना मतदारसंघात परत आणणे, त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून दुरावा मिटवणे, आणि त्यांचे सामाजिक पुनर्वसन करणे ही उमेदवारांची जबाबदारी नाही का?

अनहद सोशल फाऊंडेशनची मागणी

पुण्यातील अनहद सोशल फाऊंडेशन आणि त्यांच्या “राईट टू लव्ह” उपक्रमाचे संचालक के. अभिजीत यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे विचारले आहे की, जर उमेदवार प्रत्येक मतासाठी इतके कष्ट करत असतील, तर प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या मतदान हक्काचे संरक्षण करण्यासाठी ते का पुढे येत नाहीत?

सामाजिक प्रगल्भतेचा विचार करण्याची वेळ

प्रत्येक मतदाराने या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करावा. उमेदवारांनी फक्त निवडणुकीपुरतेच नाही, तर या जोडप्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत पुन्हा एकत्र आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत. हा मुद्दा फक्त मतदानापुरता मर्यादित नसून सामाजिक न्याय आणि जबाबदारीचाही आहे.

के. अभिजीत, संस्थापक व संचालक, अनहद सोशल फाऊंडेशन | राईट टू लव्ह
पुणे, महाराष्ट्र
मो. 9766479547 | 8329174614

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments