Friday, September 4, 2026
Homeसातारातरुण मतदारांची पसंती प्रा. रमेश आढाव यांना : प्रचारात मिळत आहे जबरदस्त...

तरुण मतदारांची पसंती प्रा. रमेश आढाव यांना : प्रचारात मिळत आहे जबरदस्त प्रतिसाद

फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना तरुण मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान प्रा. आढाव यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणांचा पुढाकार आणि विविध विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याची उत्सुकता यामुळे तरुणाईचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

संविधान समर्थन समितीच्या पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीने प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी दिली आहे. प्रचार मोहिमेतील अनुभवांवर भाष्य करताना तालुकाध्यक्ष नितीन यादव म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदार निर्णायक ठरणार आहेत. तरुणांना राजकारणापेक्षा विकासावर भर देणारा, जाणकार आणि लोकहितासाठी तत्पर असणारा आमदार हवा आहे. प्रा. रमेश आढाव या अपेक्षांची पूर्तता करणारे व्यक्तिमत्त्व असल्याने तरुण मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.”

प्रा. रमेश आढाव यांचे पत्रकारिता, सामाजिक कार्य, साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दीर्घ योगदान त्यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत लोकांमध्ये अधिक परिचित आणि विश्वासार्ह बनवते. “परिवर्तनासाठी प्रा. रमेश आढाव हा सक्षम पर्याय असून युवा मतदारांच्या पाठिंब्यावर त्यांचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

तरुणाईचा प्रचंड उत्साह आणि वाढता पाठिंबा पाहता फलटण-कोरेगाव मतदारसंघात प्रा. रमेश आढाव यांच्या विजयाची चर्चा रंगत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments