Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रअखेर ठरलं! महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; शिल्लक जागांचं गणित कसं असणार?

अखेर ठरलं! महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; शिल्लक जागांचं गणित कसं असणार?

[ad_1]

MVA Seat Sharing Formula : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत वाद सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असून आज तिन्ही प्रमुख पक्षांचे ८५-८५-८५ अशा नव्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. उर्वरित ३३ जागांवर उद्या (गुरुवार) अन्य लहान मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर झाल्याने सस्पेन्स संपला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments