Saturday, September 12, 2026
Homeसाताराभाजपात मनोज गावडे यांचा प्रवेश: राजे गटाला धक्का!

भाजपात मनोज गावडे यांचा प्रवेश: राजे गटाला धक्का!


फलटण : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील प्रभावशाली युवा नेते आणि गोखळीचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज (तात्या) गावडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजे गटाला पुन्हा एकदा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
सुरवडी येथील हॉटेल निसर्गमध्ये झालेल्या कार्यक्रमात मनोज गावडे यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, युवा उद्योजक रणजित शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“आमच्या गावाचा आणि फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे,” असे मनोज गावडे यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments