
नवरात्रीत मुंबईला परतीच्या पावसाने जोरदार तडाका दिला आहे. मुंबई व उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना तारेवरची कसरत करावी लागली. मुंबईतील दादर, लोअर परेल व दक्षिण मुंबईला सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.