
chhagan bhujbal health : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवण्यात आले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.