Saturday, September 12, 2026
Homeसातारामलठणमध्ये विकास कामांचा जल्लोष: नवी पाणी टाकी व काँक्रिटीकरणाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

मलठणमध्ये विकास कामांचा जल्लोष: नवी पाणी टाकी व काँक्रिटीकरणाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

फलटणःफलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक ३, ४ व ५ मधील मलठण येथील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ आज, २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॅड. नरसिंह निकम यांनी भूषवले. यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर आणि विविध प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये लोहार गल्ली येथील सिमेंट काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन सकाळी ९.३० वाजता, गणेशनगर येथे ९.४५ वाजता, ढोर गल्ली येथे बंदिस्त काँक्रिट गटरचे भूमिपूजन १० वाजता, संतोषी माता रोडवर रस्ता डांबरीकरण १०.४५ वाजता आणि सगुनामाता नगर येथे १० लाख लिटर पाण्याची नवी टाकी बांधण्याचे भूमिपूजन १०.३० वाजता करण्यात येणार आहे.

अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी या कार्यक्रमात 34 लाखांची बंदिस्त काँक्रिट गटार, 39 लाखांचे लोहार गल्लीचे काँक्रीटीकरण, 36 लाखांचे गणेश नगरचे काँक्रीटीकरण, तसेच संतोषी माता मंदिर रोडवरील रस्त्याचे डांबरीकरण 24 लाखांची कामे सुरु करण्यात येणार आहेत. मलठणच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या जुन्या टाकी कालबाह्य झाल्या होत्या, त्यामुळे नवी 10 लाख लिटरची टाकी बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments