Friday, September 4, 2026
Homeसाताराठाकुरकी व फरांदवाडी गावात पारध्यांचा धुडगुस; आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या...

ठाकुरकी व फरांदवाडी गावात पारध्यांचा धुडगुस; आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्तक्षेपाने पोलिसांची तत्काळ कारवाईचे आश्वासन


फलटणःफलटण तालुक्यातील ठाकुरकी आणि फरांदवाडी या गावांमध्ये पारध्यांनी घातलेल्या धुडगुसामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार रामराजे निंबाळकर यांनी तातडीने फलटणचे DYSP राहुल धस यांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या कारवाईचे निर्देश दिले.

DYSP राहुल धस यांनी आगामी १५ दिवसांत हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले असल्याची माहिती फलटण बाजार समितीचे संचालक आणि युवा नेते अक्षय गायकवाड यांनी दिली.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, तसेच युवा नेते बापूराव शिंदे यांच्यासह ठाकुरकी व फरांदवाडी गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments