Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा ऋषी कपूर यांनी डायरेक्टरला रस्त्यातच गाडीतून खाली...

माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा ऋषी कपूर यांनी डायरेक्टरला रस्त्यातच गाडीतून खाली उतरवले होते!

[ad_1]

मुंबई9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ऋषी कपूर यांचा ४ सप्टेंबरला जन्मदिवस होता. त्या दिवशी ऋषी कपूर यांच्या खूप साऱ्या बर्थ डे पार्टी मला आठवत होत्या. त्यावरून मनात विचार आला की, आजच्या भागात त्यांच्या काही आठवणी तुमच्याशी शेअर कराव्यात. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर कपूर कुटुंबाच्या तिसरी पिढीतील ऋषी कपूर यांनी सर्वाधिक काम केले आहे. कारण ते अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगले होते. त्यांना सगळे चिंटूजी म्हणायचे. ते सिनेमा साइन करण्यापूर्वीच स्पष्टपणे सांगायचे की, मी स्टोरी नंतर एेकेन. आधी माझी अट ऐका.. मी सकाळी दहाच्या आधी येणार नाही आणि रात्री आठनंतर शूटिंग करणार नाही. (कारण त्यांना घरी जाऊन सर्वांसोबत जेवण घ्यायचे असायचे). रात्रीचा सीन असेल, तर दिवसाच रात्रीचा सेट लावून शूट करावे लागेल. रविवारी शूटिंग करणार नाही, कारण तो वेळ माझ्या कुटुंबासाठी आहे. एकदा एका दिग्दर्शकाला आपल्या सिनेमाचे कथानक चिंटूजींना ऐकवायचे होती. पण, लागोपाठ शूटिंगच्या शेड्यूलमुळे ते खूप व्यग्र होते. त्या वेळी ते फिल्मसिटीमध्ये एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये गुंतले होते. म्हणून या दिग्दर्शकाने सुचवले की, तुम्ही पॅकअप झाल्यावर फिल्मसिटीतून घरी जायला निघाल, तेव्हा मी तुमच्या मेकअप व्हॅनमध्ये तुमच्यासोबत येईन. चिंटूजी ‘हो’ म्हणाले. पॅकअपनंतर ते दिग्दर्शक आणि चिंटूजी व्हॅनमधून बांद्र्याला निघाले. चिंटूजींना मेकअप व्हॅनमध्ये बसणे आवडत नव्हते, कारण ही व्हॅन एखाद्या खोलीसारखी होती. त्यांना ही खोलीच हलते आहे, असे वाटायचे. त्यामुळे त्या व्हॅनमधून जाणे त्यांना आवडायचे नाही. म्हणून ते बऱ्याचदा ड्रायव्हरसोबत समोर बसायचे. तर, त्या वेळी व्हॅनमधून जाताना ते तसेही खूप चिडले होते, कारण त्या दिग्दर्शकामुळे त्यांना मागे बसावे लागले होते. दिग्दर्शकाने सांगायला सुरुवात केली… ‘असा सिनेमा तुम्ही कधीच केला नसेल.. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, तो समाजाला आरसा दाखवेल.. यात आपण कोणतेही खोटे जग दाखवणार नाही..’ वगैरे वगैरे. याच दरम्यान गाडी हायवेवर आली. दिग्दर्शक पुढे म्हणाले, ‘या सिनेमाची कहाणी ही एका रात्रीची आहे..’ चिंटूजींचा अर्धा मूड इथंच खराब झाला. दिग्दर्शकाला थांबवून चिंटूजींनी एक प्रश्न विचारला.. ‘हा सिनेमा सेटवर शूट होणार की रिअल लोकेशनवर?’ दिग्दर्शक उत्सुकतेने म्हणाले, ‘अर्ध्यापेक्षा जास्त सिनेमाचं शूटिंग रस्त्यावर आहे. सगळं खऱ्या लोकेशन्सवर शूट केलं जाईल..’ हे ऐकताच चिंटूजींनी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली आणि त्या दिग्दर्शकाला हायवेवरच उतरवले. चिंटूजींच्या झोपण्या-उठण्याच्या, शूटिंगच्या अशा सगळ्या वेळा ठरलेल्या होत्या. खाण्या-पिण्याच्या वेळा, प्रमाण सारे ठरलेले असायचे. ऋषी कपूर यांची बर्थ डे पार्टी इतर स्टारप्रमाणे रात्रभर नसायची. मला अजूनही चांगलंच आठवतंय. आणि मीच नव्हे, तर त्यांच्या जवळच्या सगळ्या मित्रांना माहीत होते की, वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता ते टॉयलेटमध्ये जायचे आणि तिथून बाहेर आल्यावर पाहुण्यांकडं असे पाहायचे जसे काही सगळेच अनोळखी आहेत. आणि मग विचारायचे, ‘काय चाललंय? तुम्हाला घरी जायचं नाही का? काही काम नाही का? मला तर आहे.. चला, गुड नाइट..’ आणि विश्वास ठेवा, त्यांचं घर दोन ते चार मिनिटांमध्ये रिकामं व्हायचं आणि कुणालाही या गोष्टीचं वाईट वाटायचं नाही. कारण सर्वांनाच माहीत होतं की, चिंटूजींची पार्टी बाराच्या आसपास संपतेच. या शिस्त आणि अनुशासनामुळेच ते इतके काम करू शकले. ३० एप्रिल २०२० ला चिंटूजी आपल्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेले. त्या वेळी पहिला लॉकडाऊन सुरू होता. त्यांना खांदाही देऊ शकलो नाही आणि अंतिम दर्शनही घेऊ शकलो नाही, याचं दु:ख मला आयुष्यभर राहील. याच गोष्टीवरून फरहत एहसास यांचा एक शेर आठवतोय… एक रात वो गया था जहाँ बात रोक के, अब तक रुका हुआ हूँ वही रात रोक के। २०२१ मध्ये त्यांचा जन्मदिवस आला, तेव्हा लॉकडाऊन संपला होता. या वेळी त्यांचा जन्मदिवस आम्ही माझ्या घरी साजरा केला. त्या वेळी नीतू कपूरजी, रणधीर कपूरजी, शत्रुघ्न सिन्हाजी, डेव्हिड धवनजी, राहुल रवैलजी, शशी रंजन आणि इतर काही खास मित्र उपस्थित होते. माझी पत्नी हनानने एक स्पेशल केक बनवला होता. त्यामध्ये चिंटूजींच्या सगळ्या आवडीच्या वस्तूंचा समावेश केला होता. केकमधल्या या साऱ्या वस्तू चॉकलेटपासून तयार केल्या होत्या. मी चिंटूजींच्या उंचीच्या आकाराचा एक कटआऊट स्टँडी बनवला आणि आमच्या हॉलमध्ये मागच्या बाजूला ठेवला. पाहुणे आले की त्यांचे लक्ष आधी तिकडे जायचे. स्टँडीकडे पाहिल्यावर ऋषी कपूरच उभे आहेत असे वाटायचे. सर्वांनी त्या स्टँडीसोबत फोटो काढले, सेल्फी काढले. सगळेच खूप भावूक झाले होते. ऋषी कपूर यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, कुणीही त्यांना विसरू शकत नाही. चिंटूजींच्या आठवणीत त्यांच्या ‘कर्ज’ या सिनेमातील हे गाणं ऐका… दर्द ए दिल.. दर्द ए जिगर… स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

रूमी जाफरी बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments