Sunday, October 4, 2026
Homeसाताराबसमध्ये महिलेल्या गुंगीचा पदार्थ खाण्यास देऊन दागिने लांबविले ; गुन्हा दाखल

बसमध्ये महिलेल्या गुंगीचा पदार्थ खाण्यास देऊन दागिने लांबविले ; गुन्हा दाखल

फलटण |औरंगाबाद ते सांगली जाणाऱ्या एस. टी. बसमधून प्रवास करताना सौ. उषा मदन बागवडे (वय ४७, रा. बुध, ता. खटाव) यांना गुंगीचा पदार्थ खाण्यास देऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र व बोटातील अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. उषा बागवडे या फलटण बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांना आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे समजले.

या चोरी प्रकरणी सौ. उषा बागवडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्याने सुमारे ९०,००० रुपये किमतीचे २१ ग्रॅम वजनाचे त्यांचे मनीमंगळसूत्र व१२,००० रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची लाल खडा असलेली सोन्याची अंगठी, असे एकूण १,०२,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.

या चोरीचा अधिक तपास सहा. फौजदार अनिल भोसले करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments