Sunday, October 4, 2026
Homeसाताराफलटण: रामराजे नाईक निंबाळकरांचा दहशतीविरोधी एल्गार; "भाजपने साथ देऊ नये, नाहीतर तुतारी...

फलटण: रामराजे नाईक निंबाळकरांचा दहशतीविरोधी एल्गार; “भाजपने साथ देऊ नये, नाहीतर तुतारी वाजवू!”


फलटण: फलटण येथे १ सप्टेंबर रोजी लक्ष्मी विलास निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांच्या दहशतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत भारतीय जनता पक्षाला इशारा दिला की, या दहशतीला साथ मिळू नये. “अजित पवारांच्या कानावर आपली तक्रार घालू, आणि जर काहीच फरक झाला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे?” असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या वक्तव्याचे स्मरण करून दिले की, “माझ्या आई-वडिलांबद्दल अपशब्द काढल्यांच्या मंचावर मी बसणार नाही.” त्यांनी माजी खासदारांच्या कार्याचा आढावा घेताना उपरोधिक टोलेबाजी केली की, “गवगवा केला होता की पाणी आणलं, निधी आणला, तर लीड पडलच नसते.”

त्यांनी महायुतीतील स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगमनानंतर याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे संकेत दिले.

हॅशटॅग्स: #फलटण #रामराजेनाईकनिंबाळकर #राजकारण #दहशतीविरोधी #महायुती #भाजप #अजितपवार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments