Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटणमध्ये पोलीस पाटलालाच लुटले; बँकेच्या रांगेतूनच चोरी; 41 हजारांची रोकड लंपास

फलटणमध्ये पोलीस पाटलालाच लुटले; बँकेच्या रांगेतूनच चोरी; 41 हजारांची रोकड लंपास

फलटणःयेथे बँक ऑफ इंडिया मध्ये शेरेचीवडीचे (ढवळ) पोलीस पाटील दयानंद चव्हाण हे पैसे भरण्याच्या रांगेत थांबले असताना त्यांच्या पाठीवरील बॅग अज्ञात चोरट्याने कापून 41 हजार रुपयांची रोकड लंपास केली असल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; फलटण तालुक्यातील शेरेचीवडी (ढवळ) गावचे पोलीस पाटील दयानंद नारायण चव्हाण हे दि. 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेमध्ये रोख पैसे भरण्यासाठी गेले असताना त्यांच्या पाठीवरील असणारी बॅग अज्ञात चोरट्याने कापून त्यामधील रोख रक्कम 41 हजार लंपास केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस नाईक पूनम बोबडे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments