Pune ST Bus Accident: पुण्यात एसटी बसची झाडाला धडक; जवळपास २२ प्रवासी गंभीर जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक!

0
18
Pune ST Bus Accident: पुण्यात एसटी बसची झाडाला धडक; जवळपास २२ प्रवासी गंभीर जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक!


मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. परंतु, पुण्यातील यवतजवळील सहजपूर गावाजवळ बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस झाडाला धडकली. हा अपघात इतका भीषण होती की, आसपासच्या लोकांना धडकेचा मोठा आवाज आला. मात्र, हा आवाज नेमका कशाचा होता? याची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकांना एसटी बस झाडाला धडकल्याचे दिसले. अपघानंतर स्थानिकांनी वेळ न घालवता बचावकार्याला सुरुवात केली आणि जखमींना बसमधून सुरक्षित बाहेर काढले.



Source link