Modi 3.0 Cabinet oath : नरेंद्र मोदींनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे. राज्यातील सहा जणांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.