
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘एनएचआयए’ने 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी 1 एप्रिलपासून ही टोल दर वाढ लागू झाली नाही. त्यानंतर आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दर वाढवण्याचा आदेश जारी केला आहे.
नवी दिल्ली : महामार्गांवरून वाहने जाताना-येताना टोल कंपन्यांकडून टोलची आकारणी (Toll Plaza Rate) केली जाते. आता याच टोलच्या दरात लोकसभा निवडणूक संपताच वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक राज्यांमधील टोल दर जाहीर केले आहेत. हे सर्व दर सोमवारपासून लागू होतील, असेही सांगण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘एनएचआयए’ने 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी 1 एप्रिलपासून ही टोल दर वाढ लागू झाली नाही. त्यानंतर आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दर वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. टोलचे दर वाढवण्याची परवानगीही मुख्य कार्यालयाकडून मिळाली आहे. याशिवाय, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानेही टोल दरात वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली. त्यामुळे आता टोलदरात वाढ होणार हे निश्चित झाले आहे.










