
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या कालावधीत, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क (Voting Rights) बजावतील.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या कालावधीत, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क (Voting Rights) बजावतील. ज्यामधून 904 उमेदवार रिंगणात आहेत.
पंजाबमधून 328 उमेदवार आणि उत्तर प्रदेशमधून 144 उमेदवार अनुक्रमे 13-13 जागांवर उभे आहेत. बिहारमधील 8 जागांवर 134 उमेदवार, ओडिशातील 6 जागांवर 66, झारखंडमधील 3 जागांवर 52, हिमाचल प्रदेशातील 4 जागांवर 37 आणि चंदीगडमधील एका जागेवर 19 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.









