Wednesday, September 16, 2026
HomeUncategorizedवीर धरणामधून निरा उजवा कालव्यामधून पिण्यासाठी पाणी सोडणेची विनंती प्रांताधिकारी फलटण यांनी...

वीर धरणामधून निरा उजवा कालव्यामधून पिण्यासाठी पाणी सोडणेची विनंती प्रांताधिकारी फलटण यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे

फलटण प्रतिनिधी:फलटण तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. सदय परिस्थितीत तालुक्यामध्ये ८८ गावे टंचाई म्हणून घोषीत करणेत आलेली आहेत. ४१ गावामध्ये १०६ वाडया/वस्त्यासाठी 31 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. सदर गावांसाठी निरा उजवा कालव्यावर अवलंबून असलेल्या फलटण नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरुन व मौजे. सुरवडी, ता. फलटण येथील महाराष्ट्र औदयोगीक विकास महामंडळाच्या मालकीच्या असलेल्या फिडींग पाँईटवरुन टँकर भरणे सुरु आहे. तसेच फलटण तालुक्यातील ५५ गावांची नळ पाणी पुरवठा योजना निरा उजवा कालव्यावर अवलंबून आहे.

फलटण तालुक्याची एकूण लोकसंख्या ३६७७५९ इतकी असून लहान मोठ्या जनावरांची एकूण संख्या १३८९१४ इतकी आहे. सध्या टंचाई परिस्थिती असलेने फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मागणी विचार करता, फलटण नगरपरिषदेच्या टँकर मध्ये दि.१०/६/२०२४ पर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असलेबाबत मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद फलटण यांनी लेखी या कार्यालयास कळविलेले आहे. एकंदरीतच फलटण तालुक्याला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणेकामी निरा उजवा कालव्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीर धरणामधून निरा उजवा कालव्यामधून पिण्यासाठी पाणी सोडणेची विनंती प्रांताधिकारी फलटण यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments