Wednesday, September 16, 2026
Homeसातारासहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य बाजवाणाऱ्या सचिन ढोले यांनी दिनांक 1...

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य बाजवाणाऱ्या सचिन ढोले यांनी दिनांक 1 मे 2024 रोजी टपाली मतपत्रिकाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.

फलटण : 43 मला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा ) विधानसभा मतदारसंघांमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य बाजवाणाऱ्या सचिन ढोले यांनी दिनांक 1 मे 2024 रोजी टपाली मतपत्रिकाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी बोलताना सचिन ढोले म्हणाले, की भारत निवडणूक आयोगा मार्फत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, तसेच मतदारा मध्ये मतदान बाबत जनजागृती द्वारे मतदान टक्के वाढविण्यासाठी काम करत असतात लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माढा लोकसभा मतदार संघातील मतदान मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सचिन ढोले यांनी यावेळी आवाहन केले. सेल्फी पॉईंट वरती आपला मतदान केल्यानंतर सेल्फी फोटो घेतले यावेळी टपाली मतदान प्रक्रिया अधिकारी व कर्मचारी व स्वीप टीम सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments