
फलटण :आज आपल्या माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त देशाचे नेते व आपले मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार (साहेब) यांची “स्वाभिमानी सभा” प्रचंड गर्दी आणि उत्साहात पार पडली.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब इथे बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. यासोबतच त्यांनी भरसभेत नरेंद्र मोदी यांचं 2014 सालचं भाषण ऐकवलं. मोदींनी दहा वर्षात फक्त नोटबंदी केली असल्याचं म्हणत त्यांनी टोला लगावला.शरद पवार यांनी आपल्या मोबाईलमधून मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचं जुनं भाषण ऐकवलं. त्यांनी भरसभेत नरेंद्र मोदी यांचे 2014 सालचं भाषण ऐकवलं. शरद पवार म्हणाले, मोदी यांचं भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण जेवल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था असल्याचं म्हणत पवारांनी टोला लगावला
या सभेत साहेबांनी गेल्या दहा वर्षात आपल्याला विकास कामांपासून कसे रोखले. प्रत्येक योजना फक्त आणि कागदावरच राहिली हे समजून सांगितले.
येणारी निवडणूक आपल्या हक्कांच्या अस्तिस्तवाची लढाई आहे.आपण सर्वांनी आपली ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
“मोदी सरकार यांनी आपल्याला १० वर्षात काय दिले:: आदरणीय पवार साहेब”
मोदी सरकार हे गेल्या दहा वर्षांत महागाई, आणि बेरोजगारी मुद्यावर विजयी झाले. आज त्यांना सत्तेत येऊन १० वर्षे झाले. त्यांनी आपल्याला या दहा वर्षांत काय दिले तर जास्त बेरोजगारी आणि जास्त गरिबी दिली. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकदीने उभे रहा.पुढे ते म्हणाले, की मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केली जाते. ज्यांनी देशासाठी योगदान दिलं त्यांच्यावर टिका केली जात आहे. जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधी यांच्यापर्यंत सगळ्यांवर टीका केली जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आपलं आयुष्य तुरुंगात घालवलं. देशासाठी काम केलं, हे आपण विसरू शकत नाही. मात्र, त्यांच्यावर मोदी टीका करतात. इंदिरा गांधी , मनमोहन सिंह अशा सर्वच प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला. पण मोदी यांनी देशाचा विचार केला नाही. हा देश हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , शीख अशा सर्वांचा आहे, असंही ते म्हणाले .
“माढा मतदारसंघातील छोट्या छोट्या प्रश्नावर काम करण्यासाठी माझी उमेदवारी:- धैर्यशील मोहिते पाटील”
माढा मतदारसंघात प्रलंबित कामे करण्यापेक्षा जिरवा जिरवीचे राजकारण चालू आहे. त्याला हद्दपार करण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात विकास कामांवर व राजकारणात होणारे अतिक्रण आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून थांबवायचे आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते-पाटील (दादा),राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे,प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील,उत्तमरावजी जानकर,शिवाजीनाना कांबळे,माढ्याचे नगराध्यक्ष मिनलताई साठे,अभिजीत आबा पाटील,संजय कोकाटे,संभाजी शिंदे,साईनाथ अंभगराव,संजय पाटील घाटणेकर,दादासाहेब साठे,धनंजय डीकोळे,हरिदास रणदिवे,बाबाराजे देशमुख,शेखर माने,नागेश फाटे,मोडनिंचे सरपंच बाबुराव सुर्वे,भारत नाना पाटील,आशाताई टोणपे,वर्षा क्षिरसागर,सुवर्णा शिवपुरे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







