Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सर्व शाळांना सोमवारी सुट्टी

पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सर्व शाळांना सोमवारी सुट्टी

पुणे | प्रतिनिधी : हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हवामान विभागाने अतिवृष्टीचा गंभीर इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची तसेच पूर, पाणी साचणे आणि इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी, नाले, ओढे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, तसेच धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महसूल, पोलीस, आरोग्य, अग्निशमन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments