Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ, २९ एप्रिलनंतर पुढील सुनावणी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ, २९ एप्रिलनंतर पुढील सुनावणी | Navarashtra (नवराष्ट्र)


अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ, २९ एप्रिलनंतर पुढील सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवला यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अरविंद केजरीवाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अरविंद केजरीवाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. या नोटीसला न्यायालयाकडून २४ एप्रिलच्या आधी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुटकेची मागणी केली होती. मात्र करण्यात आलेल्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. ही सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. या खटल्याच्या निकालापूर्वी केजरीवाल यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कोर्टाकडून सांगण्यात आले की, कोर्टाच्या सुनावणी दरम्यान त्यांचा युक्तिवाद वादासाठी जतन करण्यात यावा. तसेच अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला आणि कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या कोठडीला आव्हान दिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.






Source link