
Mumbai Shops Marathi sign board: सर्वोच्च न्यायालयाने दुकाने, अस्थापणे यावरील फलक व बोर्ड हे मराठी भाषेत लिहिन्याचे आदेश देऊन देखील मुंबईत अनेक दुकानदार आणि आस्थापना मालकांनी मराठी फलक न लावल्याने आता मुंबई महानगर पालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असून अशा दुकानदारांना आता १ मे पासून दुप्पट मालमत्ता कर लावण्याचे आदेश दिले आहे. या सोबतच त्यांच्या प्रकाशित फलक लावण्याचा परवाना देखील तात्काळ रद्द केला जाणार आहे. हा परवाना पुन्हा नवीन घेऊन त्यांना बोर्ड लावावा लागणार, असे आदेश प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.



