Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशNational Politics | आता भाजपच झाली काँग्रेसयुक्त; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा...

National Politics | आता भाजपच झाली काँग्रेसयुक्त; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आता भाजपच झाली काँग्रेसयुक्त; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला असून, भाजप आता काँग्रेसयुक्त झाल्याचा खोचक टोला लगावला.

भोपाल : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला असून, भाजप आता काँग्रेसयुक्त झाल्याचा खोचक टोला लगावला. आता भाजपानेही दिग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप सातत्याने माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावर हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही आरोप करण्यात मागे हटत नाही. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर करत भाजपावर निशाणा साधला. या फोटोत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह मंत्री तुलसी सिलावट, काँग्रेसचे माजी आमदार अंतर सिंह दरबार आणि संजय शुक्ला दिसत आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments