Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशCrime News | मुलानं प्रेमविवाह केल्याची शिक्षा आईला, संतापलेल्या मुलीच्या कुटुंबियांनी महिलेला...

Crime News | मुलानं प्रेमविवाह केल्याची शिक्षा आईला, संतापलेल्या मुलीच्या कुटुंबियांनी महिलेला अर्धनग्न करत काढली धिंड | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मुलानं प्रेमविवाह केल्याची शिक्षा आईला, संतापलेल्या मुलीच्या कुटुंबियांनी महिलेला अर्धनग्न करत काढली धिंड

पंजाबमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. राज्यातील तरनतारनमध्ये एका तरुणाने ज्या मुलीशी प्रेमविवाह केला. त्या मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाच्या आईला अर्धनग्न करत तिची रस्त्यावर धिंड काढली.

पंजाबमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. तरनतारनमध्ये येथे अर्धनग्न महिलेची रस्त्यावर धिंड काढण्यात आल्याची घटना घडली आहे. आपल्या मुलीचा प्रेमविवाह करुन दिल्याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी  मुलाच्या आईसोबत लज्जास्पद कृत्य केलं. तिच्यासोबत गैरवर्तन करत अर्धनग्न करत तिची भररस्त्यात धिंड काढली. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

महिलेला मारहाण करून शिवीगाळ

पंजाबमध्ये मुलानं प्रेमविवाह केल्याने मुलाच्या आईला शिक्षा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या मुलाने एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे मुलीच्या घरच्यांना खूप राग आला. मुलगा आणि मुलगी दोघेही घरातून पळून गेले होते. अशा परिस्थितीत मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या आईला मारहाण केली आणि तिच्यासोबत गैरवर्तनही केले. तिला अर्धनग्न करत तिला रस्त्यावर फिरायला लावलं.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments