Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशVarun Gandhi | अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार का? त्यावर वरुण गांधी यांनी...

Varun Gandhi | अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार का? त्यावर वरुण गांधी यांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले… | Navarashtra (नवराष्ट्र)

Varun Gandhi | अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार का? त्यावर वरुण गांधी यांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीलीभीतमधील भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांच्याबद्दल विविध अंदाज बांधले जात असताना वरुण गांधी यांनी आगामी लोकसभेची निवडणूक अमेठी हायप्रोफाईल जागेवरून लढवण्याच्या अफवाचे खंडन केले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीलीभीतमधील भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांच्याबद्दल विविध अंदाज बांधले जात असताना वरुण गांधी यांनी आगामी लोकसभेची निवडणूक अमेठी हायप्रोफाईल जागेवरून लढवण्याच्या अफवाचे खंडन केले आहे. तेथून निवडणूक लढवणार नसल्याचेही सांगितले. ही जागा नेहरू-गांधी घराण्याचा अनेक दशकांपासून बालेकिल्ला आहे.

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीच्या बाहेरून पाठिंबा घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना वरुण गांधी यांनी ही माहिती दिली. दोन्ही पक्षांनी (सपा-काँग्रेस) जागावाटपाचा फॉर्म्युला मंजूर केला आणि करारात काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागा मिळाल्या आहेत. २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेल्या राहुल गांधी यांच्याकडे अमेठी १५ वर्षे होती. मात्र, राहुल यांनी केरळमधील वायनाडमध्ये दुसरी जागा जिंकली आणि तेथून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments