Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशFarmers Agitation | शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एका शेतकऱ्याचा मृत्यू तर 35...

Farmers Agitation | शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एका शेतकऱ्याचा मृत्यू तर 35 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

केंद्र सरकारसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर ‘दिल्ली कूच’कडे शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. एकीकडे दिल्लीच्या सीमांवर जेसीबी पोकलेनसह त्यांनी तळ ठोकला तर दुसरीकडे शंभू आणि खनौरी सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर ‘दिल्ली कूच’कडे शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. एकीकडे दिल्लीच्या सीमांवर जेसीबी पोकलेनसह त्यांनी तळ ठोकला तर दुसरीकडे शंभू आणि खनौरी सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर जवळपास 35 शेतकरी जखमी झाले आहेत.

आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण  लागले. शेतकऱ्यांनी खनौरी सीमेवर जबरदस्तीने बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट उडाली. यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाटी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एवढेच नाही, तर पोलिसांनी रबरी गोळ्यांचा वापरही केला. या घटनेत 20 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments