Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगफक्त बाबासाहेब आचरणात आणू ;समाजाची प्रगती करू

फक्त बाबासाहेब आचरणात आणू ;समाजाची प्रगती करू

फलटण :🔹समाजात प्रचंड हिमालया एवढ्या समस्या आहेत. त्यासाठी प्रसिद्धीची अपेक्षा न करता, निरपेक्ष बुद्धिने कार्य करणारी माणसे पाहिजेत.
🔹समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात. बाकी शेणातल्या किड्यांप्रमाणे जिवन जगतात.
जे कार्य करतात ते सुद्धा
🔹अध्यक्ष कोणी व्हावे, सेक्रेटरी कोणी व्हावे, खजिनदार कोणी व्हावे याबद्दल सर्व एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. हीच परिस्थिती जर कायम राहिली तर आपण जो हा एवढा खटाटोप करून अधिकार मिळविले ते सर्व फुकट जातील.
🔹शहाणा कोण व वेडा कोण याचा विचार करा. पण मानाला हपापलेल्या मुर्खाच्या नादी लागू नका. कोणाच्याही हातून दिवा लागो. पण आपापसातील दुही मोडा आणि तुमच्या अडचणी नाहीशा करण्याचे ज्ञान प्राप्त करून घ्या. अडचणी नाहीशा करण्याचे उपाय शोधून काढा.
🔹काही झाले तरी तुमचा स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकणार नाही याची खबरदारी घ्या आणि समाजाची मान नेहमी उंच राहील, यासाठी डोळ्यांत तेल घालून दक्ष राहा. सर्वस्व पणाला लावून तुमचा आणि समाजाचा स्वाभिमान कायम राखा.
🔹अधःपतनाबद्दल खंत वाटणाऱ्यांना मार्ग दाखविण्याचे कार्य करण्यासाठी समाजसेवकांची जरुरी आहे. समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्य करण्यासाठी सेवकांची जरुरी आहे. गरीब समाजाला त्यांना मेहनताना देता येणार नाही. पण त्यांच्या पोटापाण्याची सोय करता येईल. अशा कार्यकर्त्यांना ऐतखाऊ म्हणता येणार नाही. कारण हजार आकर्षणे सोडून समाजसेवा करावी लागते. बौद्ध भिक्खूंची संघटना ही अशाच समाजसेवेसाठी भगवंतांनी निर्माण केली आहे.
🔹कसल्याही टीकेला भीक घालण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. अविचाराने कोणालाही दुःख देण्याचे टाळा. ज्याला ज्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल त्याला त्याला सर्व प्रकारची मदत करा.

वरील ७ मुद्दे हे बाबासाहेबांचे विचार आहेत. ते फक्त क्रमाणे लावले आहेतं असे शेकडो विचार आहेत जे समाजातील प्रत्येकाला योग्य मार्गाला घेउन जाणारे आहेत.
आपण फक्त बाबासाहेब अभ्यासून आचरणात आणले पाहिजेत.
समाजाला इतर कोणाच्याही विचारांची गरज पडणार नाही.

दत्ता अहिवळे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments