Sunday, August 30, 2026
Homeसाताराविद्यालयात प्रथम येणाऱ्या कु. श्रुती सरगरचा मान्यवरांकडून घरी जाऊन गौरव

विद्यालयात प्रथम येणाऱ्या कु. श्रुती सरगरचा मान्यवरांकडून घरी जाऊन गौरव

विद्यालयात प्रथम येणाऱ्या कु. श्रुती सरगरचा मान्यवरांकडून घरी जाऊन गौरव

प्रतिनिधी | धुळदेव :-  रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील इयत्ता दहावी (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षा 2025–26 मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कु. श्रुती हणमंत सरगर हिचा तिच्या निवासस्थानी जाऊन मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, मिठाई व शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रुतीचे माजी शिक्षक तथा सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथील उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक आयु. बाबासाहेब जगताप, श्री ज्योतिर्लिंग हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आयु. विठ्ठल निकाळजे, प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी आयु. सोमीनाथ घोरपडे तसेच भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी संघटक व सामाजिक कार्यकर्ते आयु. आनंद जगताप उपस्थित होते.

मान्यवरांनी कु. श्रुतीच्या जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण यश मिळवत तिने आपल्या शाळेचा, गावाचा आणि आई-वडिलांच्या कष्टाचा सन्मान वाढविल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

उच्च शिक्षणासाठी कु. श्रुतीने सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे प्रवेश घेतला असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रुतीच्या यशामागील मोलाचा वाटा उचलणाऱ्या तिच्या कुटुंबीयांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या सत्कार समारंभामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कु. श्रुती सरगर हिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments